आंब्याचा राजा आपल्या कोकणतला; तोतापुरी, केशर अन् दशहरी आहेत तरी कुठले?

Manasvi Choudhary

आंबा

आंबा म्हटलं की कोकणचं नाव तोंडातून उमटते. आंबा आणि कोकण हे समीकरण जुनं आहे.

Mango History

भारतातील आंबा उत्पादनाची ठिकाणे

परंतु, तुम्हाला माहितीये का? फक्त कोकणातच नाही तर भारतात अनेक ठिकाणी आंब्यांचे उत्पादन घेतले जाते.

Mango History

आंब्यांच्या जाती

आंबा हा फळांचा राजा मानला जातो. सध्या आंब्याच्या अनेक जाती बाजारात विक्रिसाठी आहेत.

Mango History

महाराष्ट्र - हापूस

भारतात हापूस आंबा महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात सर्वाधिक पिकला जातो. महाराष्ट्रातला हापूस जगभरात प्रसिद्ध आहे.

Hapus Mango | Saam Tv

दक्षिण भारत- तोतापुरी

आंबट-गोड चवीचा तोतापुरी आंबा दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पिकवला जातो.

Mango History

गुजरात- केशर

गुजरातचा केशर आंबा सर्वानाच माहित आहे. केशर आंब्यांपासून आमरस चांगला होतो.

Mango History | Saam Tv

दक्षिण - भारत बंगनपल्ले

दक्षिण भारतातील बंगनपल्ले सर्वात प्रसिद्ध आंबा आहे. आंध्रप्रदेश मधील बंगनपल्ले या शहराच्या नावावरून या आंब्याला नाव पडलं आहे.

Mango History

उत्तर प्रदेश- दशहरी

दशहरी आंबा हा भारतातील उत्तरेकडील प्रदेशातील सर्वात लोकप्रिय आंब्याच्या जातींपैकी एक आहे. उत्तर प्रदेशातील मलिहाबादमध्ये या प्रजातीच्या आंब्याचे सर्वाधिक उत्पादन होते.

Mango History | pintrest

उत्तर भारत- लंगडा

लंगडा आंबा हा उत्तर भारतातील प्रसिद्ध आंबा आहे. आंब्यांच्या लंगडा या नावाचा मोठा इतिहास आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह मध्य प्रदेश, ओडिशा अनेक भागांमध्ये या आंब्यांचे उत्पादन घेतले जाते.

Mango History | yandex

NEXT: 14 Days No Sugar Challenge: १४ दिवस 'साखर' बंद! शरीरात घडतील 'हे' ५ मोठे चमत्कार

येथे क्लिक करा...