Shreya Maskar
आंब्यापासून शिरा बनवण्यासाठी आंब्याचा रस आणि बारीक तुकडे, रवा, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स, दूध आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
आंब्यापासून शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा भाजून घ्या.
रवा गोल्डन फ्राय झाला की, त्यात केशर आणि दूध टाकून रवा व्यवस्थित शिजवून घ्या.
रवा शिजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर टाकून मिक्स करून घ्या.
साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यात आंब्याचा रस टाकून मिक्स करा.
आता शिऱ्यात वेलची पावडर, जायफळ पावडर घालून छान एकजीव करा.
शेवटी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकून शिरा चांगला मिक्स करा.
अशाप्रकारे आंब्याचा मऊ-लुसलुशीत शिरा तयार झाला आहे.