Shreya Maskar
उन्हाळ्याच्या सुट्टीत आवर्जून 'मँगो राईस' बनवू खा. हा एक आंबट-गोड साऊथ इंडियन पदार्थ आहे. यात थोडा कच्च्या आंब्याचा किंवा कैरीचा वापर केला जातो. डब्यासाठी किंवा उन्हाळ्यातील हलक्याफुलक्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
'मँगो राईस' बनवण्यासाठी शिजलेला भात, हळद , मसाले, कैरी, ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, मोहरी, शेंगदाण्याचे तेल, चणा डाळ, उडीद डाळ, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
'मँगो राईस' बनवण्यासाठी सर्वप्रथम भात असा शिजवा की तो मोकळा, मऊ आणि चिकट न होता सुटा राहील. भात एका मोठ्या ताटात पसरून घ्या, त्यावर थोडे तेल सोडा आणि तो थंड होऊ द्या. त्यानंतर भातामध्ये हळद पूड हलक्या हाताने मिसळून घ्या.
फोडणीसाठी छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे घाला सोनेरी-तपकिरी रंगाचे होईपर्यंत खमंग परतून घ्या.
पॅनमध्ये मोहरी घालून तडतडू द्या. त्यानंतर चणा डाळ आणि उडीद डाळ घाला, त्यांचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि भाजलेले शेंगदाणे घालून परतून घ्या. त्यानंतर कैरीचे छोटे काप यात घाला आणि ती चांगली शिजवून घ्या.
पॅनमध्ये किसलेली कच्ची कैरी टाकल्यावर हळद पूड आणि मीठ घाला. आंबा किंचित मऊ होईपर्यंत पण किंचित आंबटपणा कायम राहीपर्यंत २ ते ३ मिनिटे परतून घ्या. अशाप्रकारे आंबट-गोड 'मँगो राईस' तयार झाला आहे.
मँगो राइसचा पापड, दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. तुम्ही यासोबत काकडीचा रायता देखील खाऊ शकता.