Sugar Free Cake Recipe : ना मैदा, ना साखर... घरच्याघरी १५ मिनिटांत बनवा टेस्टी अन् स्पाँजी केक, मधुमेही रूग्णही बिनधास्त खाऊ शकतील

Shreya Maskar

शुगर फ्री केक

शुगर फ्री केक बनवण्यासाठी रवा, खजूर, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दही, तेल , बदाम, अक्रोड, काजू, मनुका, व्हॅनिला इसेन्स आणि चिमूटभर मीठ इत्यादी साहित्य लागते.

Sugar-Free Cake | yandex

खजूर

शुगर फ्री केक बनवण्यासाठी सर्वप्रथम खजुरांमधील सर्व बिया काढून कोमट दुधात किमान अर्धा तास भिजवून ठेवा. यामुळे ते दळायला सोपे जाते.

Dates | pinterest

दही

खजूर मऊ झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवा. आता एका बाउलमध्ये दही, तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव करा. मिश्रण छान घट्ट होईपर्यंत फेटून घ्या.

Yogurt | pinterest

बेकिंग पावडर

आता त्यात खजुराची पेस्ट घाला. एका मोठ्या खोलगट भांड्यात चिमूटभर मीठ, रवा, बेकिंग पावडर सोडा मिक्स करून ती पेस्ट केकच्या मिश्रणात टाका.

Baking Powder | pinterest

दूध

तयार केलेले दही आणि तेलाचे मिश्रण घालून बॅटर बनवा, पण जास्त फेटू नका. झाकून ठेवा आणि किमान २० मिनिटे मुरू द्या. २० मिनिटांनंतर केकचे बॅटर तपासा. जर ते थोडे कोरडे वाटत असेल, तर त्याचा पोत (टेक्चर) योग्य करण्यासाठी दोन ते तीन मोठे चमचे दूध घाला.

Milk | pinterest

सुकामेवा

त्यानंतर सुकामेवा घाला पण काही वरून भुरभुरण्यासाठी बाजूला ठेवा. ओव्हन १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा. केकच्या साच्याला बटर लावा आणि त्यात सर्व मिश्रण ओता.

Dry Fruits | pinterest

केक बेक करा

उरलेला सुकामेवा वरून भुरभुरा. किमान ३० ते ३५ मिनिटे केक बेक करा. टूथपिक किंवा चाकूने केकेमध्ये घालून तो पू्र्ण शिजला का, ते तपासा. केक टूथपिकला चिकटत नसेल, तर तो तयार आहे.

Bake the Cake | pinterest

खजूर फायदे

खजुरामध्ये भरपूर फायबर असते. हे फायबर शरीरात साखरेचे शोषण मंदावते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. खजूर नैसर्गिकरित्या गोड असते.

Diabetes | pinterest

NEXT : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Sugar Free Sweet Recipes | saam tv
येथे क्लिक करा...