Shreya Maskar
आंब्याचे लाडू बनवण्यासाठी आंब्याचा रस, बेसन, पिठीसाखर, तूप, मलई, रवा, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
आंब्याचा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेसन आणि रवा एकत्र भाजून घ्या.
रवा गोल्डन झाल्यावर त्यात आंब्याचा रस मिक्स करा.
मिश्रण छान मिक्स झाल्यावर त्यात मलाई टाका.
तुमच्या आवडीनुसार यात काजू, बदाम, मणुके टाका.
मिश्रण थंड झाल्यानंतर यात पिठीसाखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण एकत्र करा.
मिश्रण थोडे गरम असतानाच त्याचे लाडू वळून घ्या.
तुम्ही यावर चांदीचा वर्ख देखील लावू शकता.