Mango Coconut Barfi: उन्हाळ्यात बनवा मऊ स्वादिष्ट आंबा नारळ वडी; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

पिकलेल्या आंब्याचा रस, किसलेला नारळ, साखर, तूप, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स असे साहित्य आंबा नारळ वडीसाठी लागते.

Mango Coconut Barfi

आंब्याचा रस तयार करा

सर्वप्रथम पिकलेले आंबे सोलून त्याचा गुळगुळीत रस तयार करून घ्या. गोड चवेसाठी रस चांगला पिकलेला असावा.

Mango Coconut Barfi

नारळ भाजून घ्या

कढईत थोडं तूप घालून किसलेला नारळ हलका भाजून घ्या. त्यामुळे वडीला छान सुगंध आणि चव येते.

Mango Coconut Barfi

मिश्रण शिजवण्याची प्रक्रिया

भाजलेल्या नारळात आंब्याचा रस आणि साखर घालून मंद आचेवर सतत हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवा.

Mango Coconut Barfi

वेलची आणि ड्रायफ्रूट्सची चव

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार बदाम, काजू किंवा पिस्त्याचे तुकडे मिसळा.

Mango Coconut Barfi

वडी सेट करण्याची पद्धत

तुपाने ग्रीस केलेल्या ताटात मिश्रण पसरवून घ्या. थोडं थंड झाल्यावर सुरीने आवडत्या आकारात वड्या कापा.

Mango Coconut Barfi

थंड झाल्यावर सर्व्ह करा

आंबा नारळ वडी पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करा. ही गोड आणि स्वादिष्ट वडी सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठी उत्तम पर्याय ठरते.

Mango Coconut Barfi

Aishwarya Rai: विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने गाजवला कान्सचा शेवटचा दिवशी, पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक व्हायरल

Aishwarya Rai
येथे क्लिक करा