Shreya Maskar
आंबा बर्फी बनवण्यासाठी आंबा, साखर, दूध, नारळाचा कीस आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
आंबा बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्लेंडरमध्ये आंब्याचे तुकडे आणि दूध टाकून त्याची पेस्ट बनवा.
आता पॅनमध्ये आंब्याची पेस्ट टाकून सर्व छान मिक्स करा.
या मिश्रणात साखर टाकून विरघळेपर्यंत एकजीव करून घ्या.
त्यानंतर नारळाचा कीस टाकून मस्त 10-१5 मिनिटे हे मिश्रण शिजवा.
आता ट्रेला बटर पेपर लावून त्यात सर्व आंब्याचे सारण टाका.
यावर तुम्ही ड्रायफुट्सने सजवा.
फ्रिजमध्ये आंबा बर्फी 1 तास सेट होण्यासाठी ठेवून द्या.