Sakshi Sunil Jadhav
खडकाळ कडा, उभ्या पायऱ्या आणि शांतता यामुळे हे ठिकाण केवळ एक नैसर्गिक चमत्कारनाही, तर इतिहास, श्रद्धा आणि निसर्गचे आहे.
नाशिकपासून अवघ्या १२५ किलोमीटर अंतरावर वसलेले हे स्थळ दरवर्षी हजारो पर्यटकांचे लक्ष वेधते.
काहींसाठी हे जैन धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तर काहींसाठी हा पर्वतारोहणाचा अविस्मरणीय अनुभव.
प्रत्येक जण येथून जाताना थक्क करणाऱ्या निसर्गसौंदर्याने आणि आत्मिक ऊर्जेने भारावून जातो.
मांगी-तुंगीच्या उंच टेकड्यांवर थेट दगडात कोरलेली प्राचीन जैन मूर्ती भक्तीचा हजारो वर्षांचा वारसा जपतात.
हजारो दगडी पायऱ्या चढताना प्रत्येक वळणावर दिसणारे अद्भुत दृश्य प्रवाशांना थकवा विसरायला लावतात.
सूर्योदय असो वा सूर्यास्त, इथे दिसणारे सुवर्ण किरण पर्वतरांगांना स्वर्गीय अनुभव देतात.