Shreya Maskar
मनगण हा पदार्थ गोवा आणि कोकणातील काही भागात बनवला जातो.
मनगण बनवण्यासाठी चणा डाळ, साबुदाणा, गूळ, नारळ दूध, काजू आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
मनगण बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या.
दुसरीकडे साबुदाणा धुवून 15- 20 मिनिटे भिजत ठेवा.
आता पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू तळून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये शिजवलेली डाळ, नारळाचे दूध, साबुदाणा, गूळ टाकून 15- 20 मिनिटे शिजवून घ्या.
शेवटी वरून तळलेल्या काजूचे तुकडे घाला.