Shreya Maskar
थन्नी चटणी बनवण्यासाठी लसूण, तेल, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, चणा डाळ, उडीद डाळ, कोथिंबीर, मीठ, मोहरी, लाल मिरच्या, हिंग, आलं आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
थन्नी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल टाकून त्यात लसूण, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, कांदा छान परतून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्यावी.
आता पुन्हा मिक्सरला भाजलेली चणा डाळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिश्रण वाटून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता, कांदा घालून फोडणी तयार करा.
एका बाऊलमध्ये चणा डाळ आणि लसूणचे मिश्रण काढून चांगले मिक्स करून घ्या.
तयार मिश्रणाला खमंग फोडणी द्या.
डोसा, इडली , वडा सर्वांसोबत चटपटीत थन्नी चटणीचा आस्वाद घ्या.