Manasvi Choudhary
हिंदू धर्मात मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, महिलांच्या प्रत्येक दागिन्याला महत्व असते ज्याचा संबंध ग्रह नक्षत्रांशी जोडलेला आहे.
स्त्रियांचे दागिने सोने आणि चांदीचे बनलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सोने हा गुरू ग्रहाचा धातू आहे आणि सोन्याची काळजी योग्य रित्या न घेतल्यास गुरू ग्रहाला अशुभ बनवते.
विवाहानंतर स्त्रिया गळ्यात पतीच्या नावाचे मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र तुटल्यास किंवा हरवल्यास ते अशुभ मानले जाते.
असे मानले जाते की, मंगळसूत्र हरवल्याने पतीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मंगळसूत्र हरवल्याने आयुष्यात मोठे संकट येऊ शकते.
मंगळसूत्र हरवले किंवा तुटले तरी गळा रिकामा ठेवू नये. जोपर्यंत मंगळसूत्र दुरुस्त होत नाही किंवा तुम्ही नवीन खरेदी करत नाही, तोपर्यंत गळ्यात काळा धागा घालावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.