Manasvi Choudhary
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्री उत्सवाला सुरूवात होते.
हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्व आहे. यंदा ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे.
नऊ दिवसांच्या नवरात्री या सणामध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्री या सणाला महिला व मुली खास पारंपारिक पोशाख करतात. दागिने घालतात.
तुम्हालाही नवरात्रीत मंगळसूत्र घ्यायचे असेल तर तुम्ही युनिक डिझाईनचे लेटेस्ट पॅटर्न निवडा.
नवरात्रीत ऑक्सिडाइज्ड दागिने घालण्याची विशेष क्रेझ असते. तुम्हालाही नवरात्रीमध्ये हटके लूक करायचा असेल तर तुम्ही काळ्या मण्यांच्या नाजूक सरमध्ये सिल्वर पेडंट असलेले मंगळसूत्र निवडू शकता.
नवरात्रीमध्ये खास तुम्ही पारंपारिक डिझाईनचे दुर्गा माता, लक्ष्मी असे पेडंटचे दागिने घालू शकता.