Manasvi Choudhary
विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा दागिना अत्यंत महत्वाचा असतो. सणासुदीला, कार्यक्रमानिमित्त साड्यांवर अनेक खास पॅटर्न्सचे मंगळसूत्र बाजारात उपलब्ध आहेत.
तुम्हीदेखील डेलीवेअरसाठी लेटेस्ट पारंपारिक आणि मॉडर्न मंगळसूत्र निवडत असाल तर हटके डिझाईन्स ट्राय करा.
अत्यंत बारीक काळ्या मण्यांची एकच चैन आणि त्यावर एक लहानसा हिरा असलेले हे मंगळसूत्र वेस्टर्न आणि फॉर्मल कपड्यांवर खूपच प्रोफेशनल लूक देते.
चांदीच्या दागिन्यांचा ट्रेंड सध्या आहे. साध्या आणि क्लासी लूकसाठी स्टर्लिंग सिल्वर बेस मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
दोन वेगवेगळ्या लांबीच्या बारीक सोन्याच्या आणि काळ्या मण्यांच्या एकत्रित लेअर्स असलेले लेयर्ड गोल्ड चैन मंगळसूत्र स्टायलिश दिसते. वेस्टर्न आऊटफिटवर तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकता.
आजकालच्या वर्किंग वुमन्ससाठी हलकेफुलके आणि मिनिमलिस्ट डिझाईन्स खूप आवडतात. यामध्ये गोल वाट्यांऐवजी थोडे चौकोनी किंवा आधुनिक आकाराचे वाट्यांचे मंगळसूत्र ट्रेडिंगमध्ये आहेत.