Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे. पितृपक्षाच्या १५ दिवसांच्या काळात पूर्वजांचे श्राद्ध घालण्याची प्रथा आहे.
पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या शांतीसाठी महत्वाचा काळ मानला जातो.
पितृपक्षात नवीन वस्तू, गृहप्रवेश, वाहन खरेदी करणे टाळले जातात. अनेक महिलांना प्रश्न आहे की, पितृपक्षात नवीन मंगळसूत्र खरेदी करावे की नाही?
जुन्या पारंपरिक मान्यतेनुसार, पितृपक्ष हा शोक आणि संयमाचा काळ मानला जातो. या काळात आनंद किंवा उत्सवाशी संबंधित नवीन गोष्टी, नवीन कपडे, सोने किंवा दागिन्यांची खरेदी करणे टाळले जाते.
पितृपक्ष म्हणजे अशुभ काळ नसून तो पूर्वजांप्रती कृतज्ञতা व्यक्त करण्याचा काळ मानला जातो . या काळात दानधर्म, ब्राम्हण भोजन आणि गरजूंना मदत करणे ही कार्ये केली जातात.
पितृपक्ष हा काळ पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे. या १५ दिवसांत साधेपणाने राहणे, गरजूंना अन्न-वस्त्र दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. त्यामुळे या काळात नवीन वस्तू खरेदी करणे टाळतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.