Manasvi Choudhary
पारंपारिक साडी असो वा फेस्टिव्हल वेअर, साडीच्या सौंदर्यामध्ये ब्लाऊजच्या डिझाईनला महत्त्वाचे स्थान असते.
तुमची साडी अगदी साधारण किंवा सिम्पल असली, तरी त्यावर जर एखादे हटके आणि स्टायलिश डिझायनर ब्लाऊज घातले, तर संपूर्ण लूक छान दिसतो.
महिलांसाठी बॅकलेस ब्लाऊजच्या ५ लेटेस्ट डिझाईन्स कोणत्या ते पाहूया.
पाठीमागे व्ही आकाराची डीप डिझाईन असलेले ब्लाऊज साडीवर अत्यंत मोहक आणि स्टायलिश दिसते. सिल्क असो वा जॉर्जेटची साडी, सर्व प्रकारच्या साड्यांवर हा पॅटर्न अतिशय खुलून दिसतो.
ज्या महिलांना थोडा बोल्ड आणि फॅशनेबल लूक आवडतो, त्यांच्यासाठी डिप बॅकलेस ब्लाऊज हा परफेक्ट आहे. पार्टी किंवा रिसेप्शनच्या खास लूकसाठी ही डिझाईन खूप आकर्षक वाटते.
पाठीमागे स्टायलिश बोडिझाईन असलेला ब्लाऊज पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामुळे ब्लाऊजला एक क्युट, ट्रेंडी आणि मॉडर्न टच मिळतो.
पारंपरिक आणि मॉडर्न लूकसाठी तुम्ही दोरी पॅटर्न निवडा. पाठीमागे सुंदर दोरी आणि खाली डिझायनर लटकन असलेला हा ब्लाऊज सुंदर दिसतो.
जर तुम्हाला पूर्णपणे ओपन बॅक किंवा दोरीची स्टाईल आवडत नसेल, तर युनिक आणि मॉडर्न फॅशनसाठी तुम्ही झिपर ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता. हा दिसायला अत्यंत क्लासी आणि स्टायलिश वाटतो.