Manasvi Choudhary
आजकाल वृद्धानाच नाही तर तरूण वयात देखील गुडघे दुखीचा त्रास उद्भवत आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे सांधे दुखतात.
चालताना आणि बसताना देखील गुडघेदुखीचा त्रास उद्भवतो यामुळे दैंनदिन कामात देखील अडथळा होतो. अशावेळी तुम्ही गोळ्या- औषधांऐवजी घरगुती उपाय करून पाहा.
आयुर्वेदात, एरंडाच्या पानांचा सोपा उपाय गुडघेदुखीवर केला जातो. एरंडाच्या पानांचा उपाय कसा करावा?
एरंडाची पाने स्वच्छ धुवून घ्या. पानांवर थोडेसे एरंडेल तेल लावा. नंतर ही पाने हलकीशी कोमट करा पाने जास्त गरम होणार नाही याकडे लक्ष द्या.
नंतर ही कोमट केलेली पाने ज्या ठिकाणी गुडघा दुखत आहे किंवा सूज आली आहे, त्या भागावर लावा.
या पानांवरून एक स्वच्छ सुती कापड किंवा पट्टी घट्ट बांधून ठेवा, जेणेकरून पानांची उष्णता आणि ओलावा गुडघ्याला मिळेल.
१) रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय केल्याने सकाळी आराम वाटेल.
२) एरंडाच्या पानांमध्ये नॅचरल अँटी-इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे गुडघ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
३) एरंडाच्या पानांचा उपाय केल्याने सांध्यांमधील ताठरपणा कमी होऊन रक्तप्रवाह सुधारतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.