शरीरात अचानक ही 10 लक्षणे दिसली तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलय, वेळीच द्या लक्ष नाहीतर

Manasvi Choudhary

उच्च कोलेस्ट्रॉल

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास त्याची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाही. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि हृदयविकार, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

High Cholesterol | pinterest

उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे

शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत देणारी १० महत्त्वाची लक्षणे कोणती असू शकतात ती या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

High Cholesterol | saam tv

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी न माहीत असणे

कोलेस्ट्रॉल वाढल्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे बाहेरून दिसत नाहीत, त्यामुळे नियमितपणे लिपिड प्रोफाइल करून रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे.

High Cholesterol

अनुवंशिकता

जर तुमच्या कुटुंबात किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा त्रास किंवा शस्त्रक्रियेचा इतिहास असेल, तर तुम्हाला याचा धोका अधिक असू शकतो. अशा वेळी आधीपासूनच अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते.

Family History | saam tv

छातीत दुखणे किंवा अस्वस्थता

छातीत दुखण्याकडे अनेकदा साधी ऍसिडिटी म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र, उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात, ज्यामुळे छातीत दाब जाणवणे किंवा आवळल्यासारखे वाटणे हा धोक्याचा इशारा असू शकतो.

Chest Pain / Angina | pinterest

श्वास घेण्यास त्रास होणे

अगदी थोडे चालल्यावर किंवा साधी कामे करताना जर अचानक दम लागत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर धमन्यांमध्ये प्लाक जमल्यामुळे रक्ताभिसरण बिघडल्याचे हे लक्षण असू शकते.

Shortness of Breath | pinterest

अचानक घाम फुटणे

कोणतीही मेहनत न करता किंवा विनाकारण अचानक घाम सुटणे, विशेषतः छातीत अस्वस्थतेसोबत असे घडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Sudden Sweating | pinterest

चालताना पायांमध्ये वेदना आणि पेटके येणे

चालताना पायांच्या स्नायूंमध्ये कळा येणे, जडपणा जाणवणे किंवा तीव्र वेदना होतात. हे पायांच्या धमन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा हा त्रास होतो.

Leg Pain & Cramps while Walking | pinterest

पायांमध्ये बधिरता आणि थंडपणा

शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने रक्तप्रवाह मंदावतो. पायांची बोटे किंवा तळवे थंड पडणे आणि पायांमध्ये बधिरता जाणवण्याची समस्या निर्माण होते.

Numbness and Coldness in Feet | saam tv

पोटावर अतिरिक्त चरबी वाढणे

पोटाचा घेर वेगाने वाढणे आणि पोटावर अतिरिक्त चरबी जमा होणे हे शरीरात ट्रायकिसराइड्स आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण मानले जाते.

Increase in Belly Fat

सतत तीव्र थकवा जाणवणे

शरीरातील अवयवांना आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा, मरगळ आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

Chronic Fatigue | saam tv

डोळ्यांमध्ये होणारा बदल

डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळसर गाठी तयार होणे हे देखील शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय संकेत मानले जाते.

eye infection | Google

NEXT: Cold Or Hot Water : थंड की गरम, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

Cold Or Hot Water
येथे क्लिक करा...