Mangalgad Fort History: मंगळगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय? जाणून घ्या रंजक इतिहास आणि वैशिष्ट्ये

Dhanshri Shintre

मंगळगड किल्ला

हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, रायगड जिल्ह्यातील महाड शहराजवळ उभा असलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला असून त्याचे महत्व अत्यंत मोठे आहे.

मूळ नाव

या किल्ल्याला पूर्वी ‘कांगोरीगड’ म्हणत असत. जावळीच्या मोऱ्यांवर विजय मिळवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून ‘मंगळगड’ असे ठेवले.

व्यापारी मार्गांवर लक्ष

महाड प्राचीन काळी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. सावित्री नदी व भोपघाट, वरंधा घाटासारख्या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी उभारलेल्या किल्ल्यांमध्ये मंगळगडाचा मोठा रणनीतिक महत्त्वाचा समावेश होता.

राजकीय महत्त्व

१६८९ साली झुल्फिकार खानने रायगड वेढताना मंगळगडावरही कब्जा केला. परंतु १६९० मध्ये रामचंद्रपंत अमात्यांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात परत मिळवला.

ब्रिटिशकालीन इतिहास

१८१७ मध्ये सरदार बापू गोखले यांनी कर्नल हंटर आणि मॉरिसन या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून मंगळगडावर कैद केले. नंतर १८१८ मध्ये कर्नल प्रोथरने किल्ला ब्रिटिशांकडे घेतला.

अवशेष

गडावर आजही प्राचीन वाडे आणि बांधकामांचे अवशेष दिसतात, तसेच तटबंदीचा काही अंश अद्यापही मजबूत अवस्थेत टिकून आहे.

नवरानवरीचे सुळके

गडाच्या खालील भागात दोन लहान सुळके आढळतात, ज्यांना स्थानिक भाषेत ‘नवरानवरीची सुळके’ म्हणून ओळखले जाते.

मंदिराचे अवशेष

तटबंदीच्या परिसरात एका प्राचीन मंदिराचे अवशेष व जवळच एक दगडी पाण्याचे कुंड आजही पाहायला मिळते.

पाण्याची टाकी

गडाच्या उत्तरेकडील भागात खडकात कोरलेल्या प्राचीन पाण्याच्या टाक्या आजही टिकून असल्याचे दिसून येते.

NEXT: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

येथे क्लिक करा