Shreya Maskar
मानगड किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. हा किल्ला माणगाव तालुक्यात, बोरवाडी गावाजवळ वसलेला आहे.
मानगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
मानगड किल्ला रायगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि जंजिराच्या सिद्दीच्या आक्रमणांना रोखण्यासाठी बांधला गेला होता.
मानगड किल्ला ट्रेकिंगसाठी एक चांगला पर्याय आहे. जो ट्रेकर्ससाठी निसर्गरम्य अनुभव देतो. त्यामुळे तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत नक्की या.
मानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खिंडीत विंझाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे दर्शनाला नक्की जा.
मानगड किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, ज्या एक वैशिष्ट्यपूर्ण रचना दर्शवतात.
मानगड किल्ल्यावरून रायगडचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. हिवाळ्यात या ठिकाणाला नक्की भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.