Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मना'चे श्लोक चित्रपट वादात अडकला आहे.
'मना'चे श्लोक चित्रपटाच्या नावावरून हा वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे.
काही हिंदू संघटनांनी 'मना'चे श्लोक नावाला विरोध नोंदवला आहे. 'मना'चे श्लोक चित्रपटाच्या नावावरून हिंदूत्वादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
'मना'चे श्लोक हे चित्रपटाचे नाव धार्मिक भावना दुखवणारे आहे. मनाचे श्लोक हे रामदास स्वामीनी लिहलेले अध्यात्मिक पुस्तक आहे.
मात्र 'मना'चे श्लोक नाव असलेल्या या चित्रपटाची कथा वादग्रस्त विषयांवर असल्याने चित्रपटाला 'मना'चे श्लोक नाव देऊ नका अशी मागणी होत आहे.
'मना'चे श्लोक चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरिश दुधाडे गे कलाकार आहेत.
चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता दिग्दर्शक, अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.