Siddhi Hande
पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात सुंदर निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी फिरायला जा.
पावसाळ्यात तुम्हाला धबधब्यांवर जायचे असेल तर माळशेज घाट हे बेस्ट ठिकाण आहे.
कल्याणपासून अवघ्या १ तासभराच्या अंतरावर माळशेज घाट आहे. ठाण्यापासूनही माळशेज घाट जवळ आहे.
हिरवीगर्द झाडी अन् फेसाळणारे पांढरेशुभ्र धबधबे तुम्हाला माळशेज घाटात पाहायला मिळेल.
माळशेज घाटात एका ठिकाणी तुम्हाला कड्यावरदेखील जाता येईल. जिथून तुम्हाला हिरवीगर्द झाडी असलेली दरी पाहता येईल.
माळशेज घाटातील या पॉइंटवर तुम्ही जर मोठ्याने ओरडलात तर तुम्हालाच तुमचा आवाज परत येईल.
माळशेज घाटात ठिकठिकाणी लहान-मोठे धबधबे आहेत. त्याखाली तुम्ही मस्त भिजू शकतात.
याचसोबत तुम्हाला माळशेज घाटात गरमागरम मॅगी, भजी आणि चहाचा आस्वाद घेता येईल.