Weekend Getaway : मुंबईकरांनो, पावसाळ्यात One Day Trip साठी हे ठिकाण आहे एकदम परफेक्ट!

Saam Tv

माळशेज घाट

पावसाळ्यात माळशेज घाटावर जाणे म्हणजे स्वर्गच. पश्चिम डोंगररांगांमधील ही एक डोंगराळ खिंड आहे. डोंगररांगावरून वाहणारे उंच धबधबे, धुक्याची चादर वातावरण आणखी सुंदर बनवते.

MALSHEJ GHAT | GOOGLE

मुंबईपासून करता येते रोड ट्रिप

मुबईहून कार किंवा बाईकने माळशेज घाटाकडे जाता येत. हे अंतर १३४.२ किमी इतके आहे. माळशेजपर्यंतचा प्रवास हा खूप आल्हाददायक आणि नयनरम्य असतो. त्यामुळे रोड ट्रिप एकदम बेस्ट.

MALSHEJ GHAT | GOOGLE

हिरवाईचा आनंद

माळशेजमध्ये ट्रेकिंगचा, उंच धबधब्यात डुंबण्याचा आनंद, डोंगर दऱ्यांमधून वाहणारी स्वच्छ हवा याचा आनंद घेता येतो. नाणे घाट, आजोबा डोंगरी किल्ला, दरकोबा शिखर ही इथली प्रसिद्ध स्थळे आहेत.

MALSHEJ GHAT | GOOGLE

पक्षी निरिक्षणासाठी उत्तम

डोंगराळ प्रदेशात अनेक पक्षांचे वास्तव्य आहे. यामुळे बरेच दुर्मिळ पक्षी इथे पाहायला मिळतात.

MALSHEJ GHAT | GOOGLE

फोटोग्राफीसाठी परफेक्ट

धु्क्यात हरवलेले डोंगर, हिरवीगारं झाडं, धबधबे यामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे.

MALSHEJ GHAT | PINTREST

ट्रिप प्लॅन करताना सावधगिरी बाळगा

पावसाळ्यात रस्ते घसरडे होऊ शकतात . त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी. हवामानाचा अंदाज घेत प्रवास करावा.

MALSHEJ GHAT | GOOGLE

One Day Trip साठी परफेक्ट

One Day Trip मध्ये मुंबईकर हा घाट पाहू शकतात. पण जर तुम्हाला राहायचे असेल तर तिथे मुक्कामासाठी अनेक ठिकाणं आहेत.

MALSHEJ GHAT | GOOGLE

टिप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

MALSHEJ GHAT | GOOGLE

Elaichi banana : आकाराने छोटी पण गुणांनी भारी! इलायची केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

elaichi banana benefits | META AI
येथे क्लिक करा