Malpua Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, खुसखुशीत आणि चविष्ट मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

मालपुआसाठी मैदा, दूध, साखर, बडीशेप, वेलची आणि तूप किंवा तेल आवश्यक आहे.

Malpua Recipe | yandex

पीठ तयार करा

एका भांड्यात मैदा घेऊन त्यात दूध हळूहळू मिसळा. गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मध्यम घट्टसर मिश्रण तयार करा.

Malpua Recipe

मिश्रणाला विश्रांती द्या

तयार केलेले मिश्रण काही वेळ झाकून ठेवा. यामुळे मालपुआची पोत अधिक मऊ होण्यास मदत होते.

Malpua Recipe

साखरेचा पाक बनवा

कढईत साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची किंवा केशर घातल्यास सुगंध आणि चव वाढते.

Malpua Recipe | Google

मालपुआ तळा

कढईत तूप किंवा तेल गरम करून तयार मिश्रणाचा छोटा भाग गोलाकार सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

Malpua Recipe

पाकात मुरवा

तळलेले गरम मालपुए काही वेळ साखरेच्या पाकात बुडवून ठेवा. त्यामुळे त्यात गोडवा व्यवस्थित मुरतो.

Malpua Recipe

गरमागरम सर्व्ह करा

तयार मालपुआ रबडी, ड्रायफ्रूट्स किंवा केशराच्या सजावटीसोबत सर्व्ह करा. सण-समारंभासाठी ही गोड रेसिपी खास ठरू शकते.

Malpua | yandex

Skin Care: चेहऱ्याच्या फ्रेशनेस आणि ग्लोसाठी रोज रात्री वापरा हा घरी तयार केलेला स्प्रे, स्किन प्रोब्लेम होतील दूर

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा