Shreya Maskar
मालपुवा बनवण्यासाठी खवा, तूप, दूध, साखर, वेलची पावडर, मैदा इत्यादी साहित्य लागते.
मालपुवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये खवा आणि दूध घालून चांगले फेटून घ्या.
खवा दूधात चांगला मिक्स झाला की त्यात मैदा घालून सर्व एकजीव करून घ्या.
आता या मिश्रणात बडीशेप घालून बॅटर थोडे घट्टसर करून घ्या.
दुसरीकडे एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात साखर घालून उकळवून घ्या.
साखर पाण्यात छान विरघळल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर वेलची पूड घाला.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मालपुवा खरपूस तळून घ्या.
आता तूपात तळलेले मालपुवा साखरेच्या पाकात काही वेळी ठेवा.वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्सने तुम्ही मालपुवा गार्निश करु शकता.