Shreya Maskar
मलंगगड (हाजी मलंग) हा किल्ला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळ (माथेरान डोंगररांगेत) आहे. हा किल्ला कल्याणपासून साधारण १५ किमी अंतरावर आहे.
मलंगगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक पावित्र्य या दोन्ही कारणांमुळे विशेष मान दिला जातो. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
मलंगगड किल्ला समुद्रसपाटीपासून ७९० मीटर (२५९० फूट) उंचीवर वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
मलंगगड किल्ल्याच्या सर्वात खालच्या पठारावर 'हाजी मलंग दर्गा' आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असल्याचे बोले जाते. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पंथांच्या भाविकांना आकर्षित करते.
मलंगगड किल्ल्यावर पोहचण्यासाठी १५०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. ज्यासाठी साधारण २ ते ३ तास लागतात. तुम्ही येथे मित्रांसोबत नक्की जाऊ शकता.
मलंगगड किल्ला आपल्या अद्वितीय नैसर्गिक संरक्षणासाठी ओळखला जातो. येथे तटबंदीच्या भिंतींऐवजी, किल्ल्याभोवती असलेल्या तीव्र उतारांच्या आणि खडकाळ दऱ्यांचा संरक्षणासाठी आधार घेतला गेला होता.
पर्वतावर वरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर ठिकठिकाणी लहान स्टॉल्स आणि दुकाने आहेत, जिथे खाण्याचे पदार्थ आणि पाणी उपलब्ध असते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.