Shreya Maskar
मलाई कुल्फी बनवण्यासाठी दूध, साखर, फ्रेश क्रीम, मिल्क पावडर, सुकामेवा, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
तुमच्या आवडीच्या फ्लेवरची कुल्फी बनवायची असेल तर (गुलकंद, मँगो, पिस्ता, स्ट्रॉबेरी) फ्लेवर लागणार.
मलाई कुल्फी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दूध गरम करून घ्या.
आता दुधात फ्रेश क्रीम, मिल्क पावडर घालून मावा तयार करून घ्यावा.
आता पॅनमध्ये पुन्हा दूध, मावा, साखर आणि सुकामेव्याचे काप घालून मंद आचेवर गोठवून घ्या.
मिश्रणात वेलची पावडर आणि आपल्या आवडीचा फ्लेवर घालून गॅस बंद करावा.
मिश्रण गार झाल्यावर ते कुल्फीच्या भांड्यात टाकून घ्या.
हे मिश्रण सेट होण्यासाठी ६ ते ७ तास फ्रिजमध्ये ठेवा.
तुमच्या आवडीनुसार त्यात सुकामेवा आणि केशर घाला.