Shreya Maskar
हळदीच्या पानातील पातोळ्या बनवण्यासाठी तूप, किसलेले ओले खोबर, किसलेला गूळ, हळदीची पाने, तांदळाचे पीठ, पाणी, वेलची पूड आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
हळदीच्या पानातील पातोळ्या बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप टाकून त्यात गूळ वितळवून घ्यावा.
आता यात किसलेले खोबरे आणि वेलची पूड घालून सारण बनवून घ्यावे.
एका भांड्यात पाणी, मीठ आणि तांदळाचे पीठ घेऊन त्या पिठाची उकड काढून मळून घ्या.
हळदीच्या पानांना तेल लावून तांदळाच्या पिठाचा गोळा हलक्या हातांनी थापून घ्यावा.
यात खोबरे आणि गुळाचे सारण भरून हळदीचे पान दुमडून घ्यावे.
आता गॅसवर गरम पाण्याचे भांडे ठेवा आणि त्यावर चाळण ठेवून पातोळ्या वाफेवर शिजवून घ्या.
२० ते २५ मिनिटांत पातोळ्या तयार होतात.