ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात पूजेच्या वेळी स्वस्तिक चिन्ह बनवणे अत्यंत शुभ मानले जाते.
स्वस्तिक चिन्हाने घरात सुख, समृद्धी येते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का घरात कोणत्या ठिकाणी स्वस्तिक काढणे शुभ ठरते.
वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते.
अंगणाच्या मध्यभागी स्वस्तिक काढल्याने घरात खेळीमेळीचे वातावरण राहते.
घरातील देवाऱ्यात स्वस्तिक काढणे चांगले समजले जाते.
कपाटातील तिजोरीवर स्वस्तिक काढल्याने आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.