Manasvi Choudhary
मखाणा उपमा हा वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट नाश्ता आहे. मखाना आणि रवा खाल्ल्याने कॅलरीज कमी होतात.
मखाना उपमा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सहज मखाना उपमा बनवू शकता.
मखाना उपमा बनवण्यासाठी मखाणा, कांदा, गाजर, मटार, हिरवी मिरची, तूप, मोहरी, कढीपत्ता, चणा डाळ, मीठ, हळद, लिंंबू, कोथिंबीर हे मिश्रण एकत्र करा.
मखाणा उपमा बनवण्यासाठी एका कढईत मखाणे भाजून घ्या कुरकुरीत मखाना थंड करून घ्या. नंतर मिक्सरमध्ये मखान्याची बारीक पावडर करा.
गॅसवर कढईमध्ये तूपामध्ये मोहरी, कढीपत्ता, चणा डाळ हे मिश्रण मिक्स करा. नंतर यात बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या
या संपूर्ण मिश्रणात गाजर, मटार मिक्स करा. नंतर यात मीठ आणि हळद घालून भाज्या वाफेवर शिजवून घ्या
भाज्या शिजल्यानंतर त्यात पाणी टाका आणि संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या. अशाप्रकारे गरमा गरम मखाना उपमा तयार होईल.