Siddhi Hande
लहान मुलांना डब्याला नेहमी काय द्यावे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यात लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवावे लागतात.
मुलांना पराठा हा खूप आवडतो. पण नेहमी मेथी किंवा आलू पराठा खाऊन मुलंदेखील कंटाळतात.
तुम्ही घरीच मखाना पराठा बनवा. हा पराठा टेस्टी आणि पौष्टिक दोन्ही असतो.
गव्हाचे पीठ, मखाने, हिरवी मिरची, आलं-लसूण-मिरची पेस्ट, जिरे पूड, मीठ, तेल, कोथिंबीर, पाणी
सर्वात आधी मखाने तुम्हाला एका पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहे. मखाने थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
यानंतर परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्या मखाण्याची पावडर टाका.
यानंतर पीठात मीठ, जिरे पूड, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट टाका. यावर कोथिंबीर टाका.
पीठात पाणी टाकून पीठ मळून घ्या. हे पीठ १० मिनिटे झाकून ठेवा.
यानंतर पीठाचा पराठा बनवून घ्या. हा पराठा तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
Next: वाटीभर पोह्यांपासून घरीच १० मिनिटांत बनवा लॉलीपॉप, एक घास खाताच मुलं होतील खुश