Makeup Side Effects : मेकअप करायला खूप आवडतो? मग शरीरावर होणारे 'हे' गंभीर दुष्परिणाम वाचून बसेल धक्का

Shreya Maskar

मेकअप

मेकअप हा महिलांच्या साज श्रृंगारातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र नियमित अति मेकअप केल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

Makeup | pinterest

मुरुम - पुरळ

फाउंडेशन लावण्यापूर्वी आणि नंतर चेहरा न धुतल्याने त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात, ज्यामुळे चेहरा तेलकट होतो. परिमाणी मुरुम, पिंपल्स, पुरळे आणि ब्लॅकहेड्स येतात.

Acne | pinterest

अकाली वृद्धत्व

मेकअपचा अति वापर हे अकाली वृद्धत्वाचे मोठे कारण आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा येतात. दररोज झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. टोनर आणि मॉइश्चरायझर लावा.

Premature Aging | pinterest

त्वचेचा रंग

अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये ब्लीच आणि इतर रसायने असतात, जी दीर्घकाळ वापरल्यास तुमच्या त्वचेच्या रंगाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे अति मेकअप टाळा.

Skin Tone | pinterest

डोळ्यांच आरोग्य

कधीकधी मेकअप वापरल्यानेही त्वचेला, डोळ्यांना संसर्ग होतो. हे सहसा तेव्हा घडते जेव्हा तुम्ही मेकअप न काढता झोपायला जाता. काजळ, मस्करा, आयलाइनर न काढता झोपल्याने नाजूक डोळ्यांवर बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे सूज किंवा संसर्ग होऊ शकतो.

Eye Beauty | yandex

ऍलर्जी

सौंदर्यप्रसाधनांमधील सुगंध आणि रंगांमुळे त्वचेवर लालसरपणा, सूज, खाज, पित्ताच्या गाठी आणि फोड येऊ शकतात. त्वचेला ऍलर्जी होते.

Allergies | pinterest

मेकअप प्रोडक्ट

मेकअप करताना मेकअप प्रोडक्टची निवड उत्तम असावी. कारण प्रोडक्टमधील दूषित घटक किंवा रसायनांमुळे त्वचेचे गंभीर आजार होतात. जे बरा होण्यासाठी अधिक वेळ लागतो, ज्यामुळे चेहरा निस्तेज होतो.

Makeup Products | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : नऊवारी नेसण्याची झंझट विसरा; फक्त १ मिनिटांत साडी नेसून होईल, वापरा 'ही' भन्नाट ट्रिक

Nauvari Saree Draping | pinterest
येथे क्लिक करा...