Makeup Tips: मेकअप करायला शिकताय? मग तुमच्या चेहऱ्याला कोणता फाउंडेशन सूट करेल जाणून घ्या

Shruti Vilas Kadam

लिक्विड फाउंडेशन

लिक्विड फाउंडेशन सर्वात जास्त वापरले जाते. हे ड्राय, नॉर्मल आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी योग्य असते. चेहऱ्यावर नैसर्गिक आणि स्मूथ फिनिश देण्यासाठी ब्रश, स्पॉन्ज किंवा बोटांनी हलक्या हाताने लावावे.

Makeup Tips Foundation

क्रीम फाउंडेशन

क्रीम फाउंडेशन जाडसर टेक्सचरचे असते आणि अधिक कव्हरेज देते. ड्राय स्किन किंवा डाग, पिग्मेंटेशन झाकण्यासाठी हे उत्तम ठरते. योग्य प्रमाणात वापरल्यास चेहरा फ्रेश आणि ग्लोई दिसतो.

Makeup Tips Foundation

पावडर फाउंडेशन

तेलकट (ऑयली) त्वचेसाठी पावडर फाउंडेशन उपयुक्त आहे. हे घाम आणि तेल नियंत्रणात ठेवते. हलक्या मेकअपसाठी किंवा टच-अपसाठी याचा वापर करता येतो.

Makeup Tips Foundation

स्टिक फाउंडेशन

स्टिक फाउंडेशन प्रवासासाठी सोयीचे असते. हे पटकन लावता येते आणि मध्यम ते जास्त कव्हरेज देते. स्पॉट कव्हरेज किंवा कॉन्टूरिंगसाठीही याचा उपयोग होतो.

Makeup Tips Foundation

मूस फाउंडेशन

मूस फाउंडेशन हलके आणि एअरी टेक्सचरचे असते. नॉर्मल ते ऑयली स्किनसाठी योग्य असून चेहऱ्यावर मॅट आणि स्मूद लूक देते. दैनंदिन वापरासाठी हा चांगला पर्याय आहे.

Makeup Tips Foundation

मिनरल फाउंडेशन

मिनरल फाउंडेशन नैसर्गिक घटकांपासून बनलेले असते. संवेदनशील त्वचेसाठी हा सुरक्षित आहे. त्वचेला त्रास न देता नैसर्गिक कव्हरेज देण्याचे काम करते.

Makeup Tips Foundation

फाउंडेशन वापरण्याचे टिप्स

त्वचेचा प्रकार आणि स्किन टोन ओळखून फाउंडेशन निवडणे महत्त्वाचे आहे. फाउंडेशन लावण्यापूर्वी मॉइश्चरायझर आणि प्रायमर वापरल्यास मेकअप जास्त काळ टिकतो आणि नैसर्गिक दिसतो.

Makeup Tips Foundation

Daily Use Hairstyle: कॉलेज ऑफिससाठी करा या 7 ट्रेंडी क्लासी हेअरस्टाईल, तुमचा लूक दिसेल अट्रॅक्टिव्ह

Daily Use Hairstyle
येथे क्लिक करा