Shruti Vilas Kadam
चेहरा स्वच्छ करून हलका मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि नैसर्गिक ग्लोइंग दिसण्यास मदत होते.
जड फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझरचा पातळ थर लावा, जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक लुक कायम राहील.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा डाग असतील तर फक्त त्या भागावर थोडासा कन्सीलर लावा.
आयब्रो पेन्सिलने खूप गडद न करता रिकाम्या जागा हलक्या हाताने भरा आणि स्पूलीने सेट करा.
पीच किंवा सॉफ्ट पिंक रंगाचा क्रीम ब्लश गालांवर हलका लावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला दिसतो.
न्यूड, पिंक किंवा तुमच्या नैसर्गिक ओठांच्या रंगाशी मिळता-जुळता टिंटेड लिप बाम वापरा.
थोडासा हायलायटर गालांच्या वरच्या भागावर आणि नाकाच्या ब्रिजवर लावा. मेकअप हलका ठेवा, म्हणजे ‘मेकअप केला आहे’ पेक्षा ‘नैसर्गिकरित्या सुंदर दिसत आहे’ असा लुक मिळेल.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.