Shruti Vilas Kadam
राईस वॉटर आणि लवंगापासून तयार केलेला स्प्रे चेहऱ्यावर वापरल्याने त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसण्यास मदत होऊ शकते.
तांदळाच्या पाण्यातील काही घटक त्वचेला मऊ आणि शांत ठेवण्यास मदत करू शकतात. यामुळे त्वचा नॅचरली ग्लो करु लागते.
लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असले तरी त्यातील घटक संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात. त्यामुळे लवंगाचे प्रमाण कमी ठेवा.
१ कप पाण्यात १ चमचा तांदूळ आणि १–२ लवंगा घेऊन 5–10 मिनिटे उकळा. पूर्ण थंड झाल्यावर गाळून स्वच्छ स्प्रे बाटलीत भरा.
चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्प्रे हलका फवारावा किंवा कॉटन पॅडने लावावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर वापरा.
लवंगेमुळे काही लोकांच्या त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे आधी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य.
हा घरगुती स्प्रे प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बनवू नका. स्वच्छ, बंद बाटलीत फ्रिजमध्ये ठेवून २–३ दिवसांत वापरून संपवणे अधिक सुरक्षित आहे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.