Manasvi Choudhary
ऑफिसला जाताना झटपट मेकअप करण्यासाठी वेळ कमी असतो अशावेळी तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करणे महत्वाचे आहे.
फक्त ५ मिनिटांत झटपट मेकअप करण्याच्या सोप्या स्टेप या वेबस्टोरीतून पाहूया.
मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि मेकअप दिवसभर टिकून राहतो.
डेली ऑफिस मेकअपसाठी हेवी फाऊंडेशन लावणे टाळा. त्याऐवजी चेहऱ्यावर बीबी क्रीम किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा नाहीसा होतो आणि सम मिळतो.
डोळ्यांचा मेकअप करण्यापूर्वी आयब्रो पेन्सिलने आयब्रोज सेट करा आणि डोळ्यांना काजळ किंवा आयलाइनर लावा.
ओठांना न्यूड किंवा लाईट शेडची लिपस्टिक लावा. जर तुम्हाला लिपस्टिक नको असेल, तर तुम्ही लिप बाम किंवा लिप टिंटचा वापर करू शकता, जो ओठांना नैसर्गिक चमक देतो.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर केस मोकळे ठेवण्याऐवजी पोनीटेल किंवा बन हेअरस्टाईल करा.