Shruti Vilas Kadam
मेकअप करण्याआधी चेहरा नीट स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसतो.
पार्टीसाठी मेकअप करताना प्रायमर खूप महत्त्वाचा असतो. तो ओपन पोअर्स कमी दाखवतो आणि फाउंडेशन स्मूद बसण्यास मदत करतो.
जास्त जड मेकअप टाळा. त्वचेच्या रंगाशी जुळणारे, हलके आणि लॉन्ग-लास्टिंग फाउंडेशन किंवा BB क्रीम निवडा.
पार्टी लूकसाठी आयशॅडो, आयलाइनर आणि मस्कारा यांचा योग्य वापर करा. ग्लिटरी किंवा स्मोकी आय मेकअप पार्टीसाठी परफेक्ट ठरतो.
गालांवर हलका ब्लश आणि हायलाइटर लावल्यास चेहरा फ्रेश आणि ब्राइट दिसतो. जास्त प्रमाण टाळा.
ड्रेस आणि आय मेकअपशी मॅच होणारी लिपस्टिक वापरा. मॅट किंवा ग्लॉसी लुक तुमच्या आवडीनुसार निवडा, पण लॉन्ग-लास्टिंग असावी.
शेवटी सेटिंग स्प्रे किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरून मेकअप सेट करा. यामुळे पार्टीभर मेकअप तसाच राहतो.