Shreya Maskar
मेकअप काळा पडण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे तेलकट त्वचा. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर मॅट फिनिश देणारा प्रायमर लावा.
फाउंडेशनचा चुकीचा शेड निवडल्यामुळे मेकअप केल्यावर चेहरा काळा होतो. तसेच चेहऱ्याला ॲलर्जी देखील होऊ शकते.
आपल्या त्वचेच्या अंडरटोन प्रमाणे योग्य फाउंडेशन निवडा करा. जेणेकरून चेहरा काळा किंवा पांढरा दिसणार नाही.
जास्त मेकअपचे थर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा काळा पडतो. त्यामुळे कमी मेकअप लावा. चेहऱ्याला चांगला ग्लो येईल.
प्रमाणापेक्षा जास्त फाउंडेशन, कन्सीलर आणि पावडर लावल्याने मेकअप खराब होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
मेकअप कधीही Lightweight करावा. जेणेकरून चेहरा जड होणार नाही किंवा पांढरा पडणार नाही.
मेकअप संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यावर त्यावर सेटिंग स्प्रे मारा. जेणेकरून मेकअप दीर्घकाळ चांगला राहील.
मेकअप करण्यापूर्वी चेहरा मॉइश्चरायझ करा. चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. मेकअप प्रोडक्ट चांगल्या ब्रँडचे आणि विश्वसनीय ठिकाणाहूनच खरेदी करा.