Shruti Vilas Kadam
सर्वात आधी चेहरा नीट धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून मेकअप त्वचेवर नीट बसेल.
प्रायमरमुळे मेकअप लांब टिकतो आणि त्वचा स्मूथ दिसते.
चेहऱ्याचा टोन इव्हन करण्यासाठी हलक्या हाताने फाउंडेशन किंवा बीबी क्रीम ब्लेंड करा
डार्क सर्कल्स, पिंपल मार्क्स आणि स्पॉट्स लपवण्यासाठी कन्सीलर वापरा.कन्सीलर जर नीट लावलं तर केलेला मेकअप काळा पडतं नाही.
चेहऱ्याला शार्प लुक देण्यासाठी कंटूर, फ्रेशनेससाठी ब्लश आणि ग्लो साठी हायलाइटर लावा.
आयशॅडो, आयलाइनर आणि मस्करा वापरून डोळ्यांना डेफिनेशन द्या.
शेवटी लिपस्टिक लावा आणि मेकअप सेटिंग स्प्रेने पूर्ण मेकअप लॉक करा. काही वेळा मेकअप सेटिंग स्प्रे मुली लावतं नाही यामुळे मेकअप नीट बसत नाही आणि चेहरा काळा पडतो.