Shruti Vilas Kadam
फाउंडेशनचा चुकीचा शेड, अंडरटोनकडे दुर्लक्ष, चुकीचे कलर करेक्शन आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने मेकअप काही वेळाने काळा किंवा ग्रे दिसू शकतो.
त्वचेवर सीबमचे प्रमाण जास्त असल्यास मेकअप ऑक्सिडाइज होण्याची शक्यता वाढते. जास्त घाम येणाऱ्या आणि उष्ण-दमट वातावरणात राहणाऱ्यांनाही ही समस्या जाणवू शकते.
फाउंडेशन निवडताना त्वचेचा टोन आणि अंडरटोन लक्षात घ्या. फाउंडेशन थेट जॉलाइनवर टेस्ट करून योग्य शेड निवडणे महत्त्वाचे आहे.
क्लेंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग त्वचेच्या प्रकारानुसार करा. खूप ऑयली क्रीम किंवा फेस ऑइल लावून लगेच मेकअप केल्याने बेस ग्रे दिसू शकतो.
विशेषतः ऑयली त्वचेसाठी मॅटिफाइंग किंवा योग्य प्रकारचा प्राइमर वापरल्याने मेकअप बेस अधिक चांगला राहण्यास मदत होते.
गरज असल्यास दुसरी लेयर लावा; मात्र पहिल्या लेयरला सेट होण्यासाठी काही वेळ द्या. प्रत्येक लेयरमध्ये फिक्सिंग स्प्रे वापरल्याने बेस अधिक व्यवस्थित दिसू शकतो.
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल ब्लोटिंग पेपर किंवा टिश्यूने हलकेच काढा. त्यानंतर थोडा ट्रान्सलूसंट पावडर लावा. गरज असल्यास आधीच्या फाउंडेशनपेक्षा एक टोन गडद फाउंडेशनची पातळ लेयर ब्लेंड करा.