Shruti Vilas Kadam
रक्षाबंधनच्या निमित्ताने बहिणीला दागिना गिफ्ट करायचा असेल तर सिल्व्हरच्या कानातले हा सुंदर आणि उपयोगी पर्याय ठरू शकतो.
रोजच्या वापरासाठी साध्या आणि गोलाकार हूप कानातले निवडता येतील. पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही लुकसोबत त्या सहज मॅच होतात.
थोडा ट्रेंडी आणि हटके लुक आवडणाऱ्या बहिणीसाठी ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कानातले चांगला पर्याय ठरू शकतो.
फ्लोरल, पानांच्या आकाराचे किंवा नक्षीदार डिझाइन असलेल्या कानातले फेस्टिव्ह लुकसाठी आकर्षक दिसतात.
ऑफिस किंवा कॉलेजमध्ये रोज घालता येतील असे छोटे आणि हलके कानातलेही गिफ्ट करता येतात. अशा डिझाइन्स साध्या पण स्टायलिश दिसतात.
एथनिक ड्रेस, साडी किंवा कुर्तीसोबत पारंपरिक सिल्व्हर कानातलेंची जोडी सुंदर दिसू शकते.
गिफ्ट घेताना तिची स्टाइल, रोजचा आऊटफिट आणि दागिन्यांची आवड लक्षात घ्या. यामुळे रक्षाबंधनची भेट अधिक खास होईल. रक्षाबंधन २०२६ मध्ये २८ ऑगस्टला साजरे केले जाणार आहे.