Makeup Removal Tips: रोज मेकअप करता? मग मेकअप काढताना या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

Shruti Vilas Kadam

मेकअप रिमूव्हर वापरा

चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर वापरा. वॉटरप्रूफ मस्कारा, आयलायनर आणि लिपस्टिक काढण्यासाठी योग्य रिमूव्हर निवडा. यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते.

Homemade Makeup Remover | Saam Tv

डोळ्यांचा मेकअप हळूवार काढा

डोळ्यांची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे मस्कारा, आयलायनर आणि आयशॅडो काढताना डोळे जोरात चोळू नका. कॉटन पॅडवर रिमूव्हर घेऊन हलक्या हाताने डोळे स्वच्छ करा.

Homemade Makeup Remover

फेसवॉशने चेहरा धुवा

मेकअप काढल्यानंतर चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावर राहिलेले मेकअपचे कण, धूळ आणि तेल निघून जाण्यास मदत होते. तुमच्या त्वचेला योग्य असा फेसवॉश वापरा.

Homemade Makeup Remover

ओठ स्वच्छ करायला विसरू नका

मेकअप काढताना अनेकजणी ओठांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ओठांवर लिपस्टिक राहते. ओठ स्वच्छ करण्यासाठी मेकअप रिमूव्हर वापरा. त्यानंतर ओठांना लिप बाम लावा.

Homemade Makeup Remover

चेहरा टॉवेलने जोरात पुसू नका

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने जोरात घासू नका. मऊ आणि स्वच्छ टॉवेलने चेहऱ्यावरील पाणी हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे त्वचेला त्रास होणार नाही.

Makeup Removal | Yandex

मॉइश्चरायझर लावा

मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडा.

Homemade Makeup Remover | Saam Tv

मेकअप न काढता झोपू नका

दिवसभर कितीही थकवा आला तरी चेहऱ्यावरील मेकअप न काढता झोपू नका. यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करण्याची सवय लावा.

Homemade Makeup Remover

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Makeup Tips

College Outfits For Winter: हिवाळ्यात कॉलेजला जाताना दिसा स्टायलिश! ट्राय करा ७ ट्रेंडी आणि कोझी विंटर आउटफिट्स

College Outfits For Winter | Saam Tv
येथे क्लिक करा