ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रवा, तीळ, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, गूळ, वेलची पूड, तूप
सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या आणि त्यामध्या तूप आणि पाणी घालून चांगलं मिक्स करा.
त्यानंतर तयार मिश्रण बाजूला ठेवा. दुसरीकडे कढईत शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीस चांगला भाजून घ्या.
त्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचा कूट तयार कून त्यामध्ये गुळ बारीक करून मिक्स करा.
त्यानंतर सर्व कत्र वाटून त्यामध्ये चविनुसार वेलची पूड मिक्स करून घ्या. यानंतर रव्याच्या पीठाचे गोळे तयार करा.
त्यानंतर रव्याच्या पुऱ्या लाटून त्यामध्ये गूळ-खोबऱ्याचं सारण भरून घ्या. त्यानंतर तवा गरमकरून त्यावर या पुऱ्या भाजून घ्या.
पुऱ्यांना दोन्ही बाजून तूप लावून खरपूस भाजून घ्या . अशा प्रकारे तुमच्या गरमा गरम गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या तयार.