Salad Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा मुळ्याची कोशिंबीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मुळा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोशिंबिर, मीठ, साखर, मोहरी, जिरं, तेल, दही

Ingredients | Yandex

मुळे किसून घ्या

सर्वप्रतम मुळे स्वच्छ पाण्याने धुवा आणि जाडसर किसून घ्या.

Grate the roots | Yandex

भाज्यांचे बारिक तुकडे करा

त्यानंतर टॉमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि हिरव्या मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

Finely chop the vegetables | Yandex

सामग्री छान एकत्र करा

आता एका भांड्यामध्ये मुळ्याचा कीस, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, दही, साखर, मीठ घालून छान एकत्र करून घ्या.

Mix the ingredients well | Yandex

जिऱ्याची फोडणी तयार करा

त्यानंतर एका फोडणीच्या पॅनमध्ये थोडं तेल तापवा आणि त्यामध्ये मोहरी, मिरच्या आणि जिऱ्याची फोडणी तयार करा.

cumin | Yandex

कोशिंबिर फ्रिजमध्ये ठेवा

तयार फोडणी मुळ्याच्या मिश्रणात टाका आणि चांगलं मिक्स करुन घ्या आणि कोशिंबिर फ्रिजमध्ये ठेवा.

Keep the salad in the fridge | Yandex

कोशिंबिर सर्व्ह करा

जेवताना ताटामध्ये थंड गार कोशिंबिर सर्व्ह करा. यामुळे तुमच्या जेवणाची चव अधीक वाढेल.

Serve Salad | Yandex

NEXT: वटपौर्णिमेला घ्या हे खास उखाणे, नवरा होईल खुश

Vat Purnima 2024 | Social Media
येथे क्लिक करा...