ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते.
घरोघरी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारावर गुढी उभारली जाते
गुढीपाडव्या निमित्त घरात श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो.
तुम्ही देखील तेच तेच श्रीखंड खाऊन कंताळला आहात का? तर घरच्या घरी हे अनोखे फ्लेवर्स वापरुन श्रीखंड बनवा
श्रीखंड बनवण्यासाठी चक्का घ्या त्यामध्ये पीठीसाखर टाकून ते मिश्रण फेटून घ्या. त्यानंतर वेलची पूड, दूधात भिजवलेले केसर, बारीक चिरलेला पिस्ता टाकून मिश्रण एकजीव करा.
चक्का आणि पिठीसाखर यांच्या मिश्रणात घरी बनवलेला स्ट्रॉबेरी पल्प आणि स्ट्रॉबेरीच्या बारीक फोडी टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या.
चक्का आणि पिठीसाखर हे एकत्र फेटून मिश्रण तयार करुन घ्या त्यानंतर यात वेलची पावडर, जायफळ पावडरत्यानंतर यात टुटी-फ्रुटी टाकून एकजीव करा.
चक्का आणि पिठीसाखरेच्या मिश्रणात हे वितळलेले चॉकलेट नीट एकजीव करुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये बदाम किंवा काजू घाला.