ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मक्क्याच्या दाण्यांना जाडसर वाटून घ्या. तांदूळ, बेसन आणि मसाले मिक्स करुन मिश्रण तयार करुन घ्या. ही टेस्टी आणि क्रिस्पी कॉर्न भजी तुम्हाला नक्की आवडेल.
मोठ्या वांगीचे गोल आकारात काप करुन घ्या. पावसाळ्यात या टेस्टी भजीचा आनंद घ्या
फ्लावरचे लहान तुकडे करुन घ्या. बेसनच्या आणि मसाल्यांच्या मिश्रणात मिक्स करुन भजी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा.
पालकला स्वच्छ धुवून बेसनमध्ये मिक्स करुन तेलात क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा. गरमागरम चहासोबत पालकभजी सर्व्ह करा.
पनीरला चौकोनी आकारात कापून घ्या. मसाले आण बेसनमध्ये मिक्स करुन भजीचा रंग सोनेरी होईपर्यंत तळा.
कुरकुरीत कांदा भजीसाठी कांद्याला बारीक आणि लांब चिरुन घ्या. बेसन आणि मसाल्यांमध्ये मिक्स करुन भजी कुरकुरीत तळून घ्या.
बटाट्याचे बारीक काप करुन बेसनच्या मिश्रणामध्ये मिक्स करुन गरम तेलात तळा.