ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कच्ची केळी, शेंगदाणे, काजूचे तुकडे, खोबऱ्याचा किस, बेदाणे, तीळ, मीठ, हळद, तिखट, साखर, तेल, हिंग, मोहरी, धने-जिरेपूड.
सर्वप्रथम कच्या केळींचे साल काढून घ्या. त्यानंतर केळींचा जाडसर किस करून घ्या.
केळींचा जाडसर किस स्वच्छ पाण्यात धुवून त्यानंतर एका कापडावर पसरवून घ्या.
यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि यात तेल गरमहोण्यासाठी ठेवा. त्यानंतर यात तयार किस टाकून कुरकुरीत तळून घ्या.
एका दुसऱ्या कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये हिंग, मोहरीची फोडणी करून त्यावर शेंगदाणे, काजू तुकडे, खोबऱ्याचा किस बेदाणे, तीळ, तळून घ्या.
त्यानंतर फोडणीच्या कढईमध्ये तयार तळलेला कुरकुरीत केळ्यांचा किस मिसळून चांगला मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यावरून मीठ, साखर, हळद, तिखट, धने-जिरे पूड घालून मिक्स करा.
गॅस बंद करून सर्व सामग्री एकत्र मिक्स करा तुमचा कच्चा केळींचा चमचमित चिवडा तयार.