Surabhi Jayashree Jagdish
किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. किडनीचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं ठेवण्यासाठी काही साध्या पण प्रभावी सवयी महत्त्वाच्या मानल्यात जातात. या सवयींमुळे किडनीवरील ताण कमी होतो आणि तिचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. या सवयी कोणत्या आहेत ते पाहूयात.
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत होते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडं-थोडं पाणी पिण्याची सवय असावी.
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे प्रोसेस्ड पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. शिवाय घरच्या जेवणातही अतिरिक्त मीठ घालणं टाळावं.
तुमच्या किडनीसाठी योग्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्यानुसार फळं, भाज्या, धान्यं आणि कमी चरबीयुक्त प्रोटीन यांचा समावेश करा. जंक फूड, साखर अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचं सेवन शक्यतो टाळावं.
नियमित शारीरिक हालचाल जसं की चालणं, सायकल चालवणं किंवा योगा करणं यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे घटक किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अनियंत्रित मधुमेह आणि ब्लड प्रेशर यामुळे मोठ्या प्रमाणात किडनीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रक्तातील साखर आणि रक्तदाबाची नियमित तपासणी करून वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे.
काही पेनकिलर्स औषधांचा अतिवापर किंवा दीर्घकाळ वापर केल्यास किडनीचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही औषधं फक्त गरज असेल तेव्हाच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली पाहिजेत.
मद्यपान आणि धूम्रपानामुळे किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे किडनीच्या इतर समस्यांचा धोका वाढतो. म्हणून मद्यपान आणि धूम्रपान कमी करणं किंवा पूर्णपणे सोडणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
ही माहिती केवळ जागरूकता आणि सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.