Siddhi Hande
सँडविच हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.
चॉकलेट सँडविच तर लहान मुले खूप आवडीने खातात.
चॉकलेट सँडविच बनवण्यासाठी ब्रेड, चॉकलेट, बटर, किसलेले चॉकलेट, बदामाचे काम आणि चॉकलेट टॉपिंग्स लागतात.
सर्वात आधी तुम्हाला ब्रेड स्लाईसला दोन्ही बाजूने छान भरपूर बटर लावून घ्यायचे आहे.
यानंतर त्या स्लाईसवर चॉकलेटचा मस्त थर लावा. तुमच्या आवडीनुसार डार्क चॉकलेट, मिल्क चॉतलेट किंवा चॉकलेट स्प्रेड लावू शकतात.
यानंतर या चॉकलेटवर दुसरी ब्रेड स्लाईस लावा.
यानंतर तुम्ही हे सँडविच मशीनमध्ये किंवा तव्यावर छान गरम करु शकतात.
सँडविच तयार झाल्यानंतर त्यावर बदामाचे तुकडे किंवा इतर टॉपिंग्स टाकून मस्त खाऊ शकतात.