Dhanshri Shintre
तुम्ही बटाट्याचे काप किंवा भजी अशा अनेक पदार्थांची चव घेतली असेल, पण कधी बटाट्याचे क्रिस्पी ट्विस्टर्स बनवून पाहिले आहेत का?
बटाटे, पाणी, १ चमचा कश्मिरी मिरची, १ चमचा मीठ, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, तेल
बटाट्यांना धुवून सोलून, लांबट आणि जाड काप घ्या. १५ मिनिटे पाण्यात ठेवा.
एक कप पाणी, १ टेबलस्पून कश्मिरी मिरची, १ टेबलस्पून मीठ आणि अर्धा कप कॉर्नफ्लोर घेऊन ते चांगले मिक्स करा.
बटाट्याचे काप या मिश्रणात टाकून चांगले मळून घ्या, म्हणजेच सर्व बाजूंनी मसाले लागलेले असतील.
पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्या मध्ये स्पायरल बटाट्यांचे काप घालून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
एकदा तळल्यानंतर, ते टिश्यू पेपरवर ठेवा, ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल.
तुमचा क्रिस्पी ट्विस्टर तयार आहे. आनंद घ्या!
NEXT: स्वादिष्ट भजी कुरकुरीत बनवण्यासाठी घरगुती 'या' टिप्सचा करा वापर