Surabhi Jayashree Jagdish
आई म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते, तर तिच्याही मनात कधीकाळी अनेक स्वप्नं, इच्छा आणि भावना दडलेल्या असतात. आयुष्याच्या प्रवासात ती मुलगी, मैत्रीण, पत्नी आणि शेवटी आई बनत जाते. म्हणूनच या मदर्स डेला तुमच्या आईला असे प्रश्न विचारा जे आयुष्याचा एक वेगळाच आणि भावूक पैलू आपल्यासमोर आणतील.
प्रत्येक आईचं स्वतःचं एक वेगळं आयुष्य असतं आणि ते फक्त मातृत्वापुरतं मर्यादित नसतं. तिच्याही काही आवडी, मित्रमैत्रिणी, स्वप्नं आणि आयुष्याबद्दलच्या अपेक्षा असतात. हा प्रश्न विचारल्यावर ती तिच्या तरुणपणातील आठवणी आणि न जगलेल्या क्षणांबद्दल बोलू शकते.
अनेक महिलांना काही स्वप्नं पूर्ण करायची असतात, पण परिस्थितीमुळे त्यांना त्याग करावा लागतो. काहींना करिअर करायचं असतं, काहींना शिक्षण पूर्ण करायचं असतं, तर काहींना वेगळं आयुष्य जगायचं असतं. हा प्रश्न आईच्या मनात दडलेल्या अपूर्ण इच्छा आणि त्याग समजून घेण्याची संधी देतो.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही कठीण टप्पे येतात आणि आई त्याला अपवाद नसते. कधी आर्थिक अडचणी, कधी नातेसंबंधातील ताण, तर कधी एकटेपणा तिने शांतपणे सहन केलेला असतो.
प्रेम नेहमी मोठ्या गोष्टींमधूनच जाणवतं असं नाही, तर छोट्या क्षणांमधूनही ते अनुभवता येतं. कदाचित एखाद्या आजारपणात कुणी हात धरला असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिलेला आधार तिच्यासाठी खास ठरला असेल.
मुलांना अनेकदा वाटतं की त्यांना आई पूर्णपणे माहित आहे, पण तिच्या मनात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. ती कधी स्वतःच्या भावना लपवून फक्त कुटुंबासाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असते.
आई अनेक मोठमोठे संघर्ष शांतपणे पार पाडत असते, पण त्याचं कौतुक फार कमी वेळा होतं. त्यामुळे हा प्रश्न तिला तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव करून देतो.
आईच्या इच्छा आणि स्वप्नं वयानुसार संपत नाहीत, ती फक्त अनेकदा बाजूला पडतात. कदाचित तिला एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल, फिरायला जायचं असेल किंवा स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल.